"मातृभाषेवर असलेलं प्रेम आणि लिहिण्याची आवड यातून अगदी सहज साकारत गेलेला कविता संग्रह म्हणजे 'सुरवंट'. आयुष्यात येणाऱ्या समस्या, त्यावर मात करण्याची तयारी, डोळ्यात इवलीशी स्वप्न आणि त्यांना पूर्ण करण्याची धडपड ह्या सगळ्याचा सारच जणू हा कवितासंग्रह. शब्दाच्या सामर्थ्याबद्दल मी नव्याने काय सांगणार? आणि त्यामुळे मला जगण्याचं बळ तर मिळालं पण माझ्यासारख्या अनेकांना झेप घ्यायला प्रवृत्त करण्यासाठी हा सुरवंटाचा घाट. वाटेत काचा, खळगे अन् खाचा प्रत्येकाच्या असतात, पण सगळं पार करूनच गगनभरारी घेण्यासाठी पंख प्राप्त होतात. वयाच्या १८ व्या वर्षात पाऊल टाकताना माझ्यासोबत असणारं हे सुरवंट तरुण पिढीला प्रोत्साहित करेल हे नक्की. प्रगतीपथावर चालताना येणाऱ्या सर्व निखाऱ्यांना पार करून, चढ-उतारांना तारून याच काव्याच्या साक्षीने अनन्यसाधारण अशा यशाच्या शोधात असणाऱ्या शब्दांना तन्मयतेच्या शुभेच्छा!"
Survant
₹150.00Quis autem vel eum iure reprehenderit qui in ea voluptate velit esse quam nihil molestiae consequatur, vel illum qui dolorem eum fugiat quo voluptas nulla pariatur erit qui in ea voluptate
0 review for Survant
No reviews to display.